Google Play Store मधून ॲप काढून टाकले आहे

तुम्ही Google Play वर सध्या उपलब्ध नसलेले एखादे ॲप शोधत असल्यास, ते ॲप डेव्हलपरने Google Play वरून काढून टाकले असावे किंवा त्या ॲपने आमच्या Google Play डेव्हलपर प्रोग्राम धोरणे आणि डेव्हलपर वितरण करारनामा यांचे उल्लंघन केले असावे व ते Google Play वरून काढून टाकले किंवा निलंबित केले असावे.

एखादे ॲप Google Play डेव्हलपर प्रोग्राम धोरणे यांचे उल्लंघन करत असल्याचे तुम्हाला आढळल्यास, एखाद्या ॲपबाबत Google Play Store वर तक्रार कशी नोंदवावी याविषयी तुम्ही अधिक जाणून घेऊ शकता.

Google Play वरून एखादे ॲप काढून टाकल्यास काय होते?

ते ॲप यापुढे Google Play वर डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध नसेल. तुम्ही तुमच्या डिव्हाइसवर ॲप इंस्टॉल केले असल्यास, ॲप वापरणे पुढे सुरू ठेवू शकता, तथापि तुम्हाला तुमचे ॲप अपडेट करता येणार नाही. ॲप आधीपासून इंस्टॉल केलेले असले, तरीही Google Play ची बिलिंग सिस्टीम ही Google Play मध्ये ॲप उपलब्ध नसताना काम करणार नाही.

Google Play वरून एखादे ॲप काढून टाकल्यास, ते ॲप माझ्या डिव्हाइसमधून काढून टाकले जाईल का?

नाही, ॲप तुमच्या डिव्हाइसमधून काढून टाकले जाणार नाही. तुम्ही ॲप वापरणे पुढे सुरू ठेवू शकता, तथापि तुम्हाला तुमचे ॲप अपडेट करता येणार नाही. तुम्ही ते ॲप तुमच्या डिव्हाइसमधून काढून टाकल्यास, डेव्हलपरने Google Play वर पुन्हा प्रकाशित करेपर्यंत तुम्हाला ते ॲप पुन्हा डाउनलोड करता येणार नाही.

माझ्याकडे Google Play वरून काढून टाकलेल्या एखाद्या ॲपचे ॲक्टिव्ह सदस्यत्व असल्यास, त्याचे काय होते?

तुमच्‍या सदस्‍यत्वाचे बिल Google Play च्‍या बिलिंग सिस्‍टीमद्वारे आकारले जात असल्‍यास, तुमचे सदस्यत्व रद्द केले जाऊ शकते, हे तुमच्या रिन्यूअलची तारीख आणि ते ॲप रिस्टोअर किंवा पुन्हा प्रकाशित केले जाणार आहे का या गोष्टींवर अवलंबून असते.

मला Google Play वरून काढून टाकलेल्या ॲपवरील खरेदीचा परतावा मिळू शकतो का?

Google बहुतांश Google Play खरेदीवर परतावे देत नाही. मात्र, याला अपवाद आहेत. तुम्ही येथे अधिक जाणून घेऊ शकता.

शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
4495938779325465053
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
84680
false
false